पुणे : कात्रज, आंबेगाव भागात दहशत माजविणाऱ्या येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीतून अटक केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपूरे टोळीविरुद्ध कारवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर तो गेले दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.

याप्रकरणी प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) याला अटक करण्यात आली. येनपूरे याच्यासह साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपासून भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर येनपूरे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. येनपूरे मोबाइल संच वापरत नव्हता, तसेच तो वास्तव्याचे ठिकाणही बदलायचा. त्यामुळे तांत्रिक तपासात त्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नव्हती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी त्याचा माग काढत होते.

Drugs worth Rs 2.5 crore seized in Boisar crime news
बोईसर मध्ये अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त; एका आरोपीला अटक
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
akola crime branch arrested inter state gang for breaking shop shutters and stealing goods
आता चोरांची शटर गँग; आंतरराज्य ‘शटर गँग’ अकोल्यात जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणामध्ये…
Bangladeshi arrested from ashale village
उल्हासनगरात पुन्हा एक बांगलादेशीला अटक; आशेळे गावात पुन्हा कारवाई, आतापर्यंत २० जण ताब्यात
36 year old man attacked police officers at gadevi with stone on Thursday
सराफ बाजारात कारागिराकडील २० लाखांचे दागिने चोरी; पिशवी हिसकावून चोरटे पसार
pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
Four arrested in Ratnagiri for stealing mobile tower batteries
रत्नागिरीत मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी प्रकरणी चौघांना अटक; सहा लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत

हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?

हेही वाचा – वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड, महानगरपालिकेने बजावली नोटीस

तपासात तो बारामतीतील नीरा वागस परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून येनपूरेला नीरा वागस परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश माेकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader