म्हाडाची तीन हजार घरांसाठी सोडत

चालू वर्षी जानेवारी महिन्यातद पिंपळे वाघिरे येथील ९९५ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती.

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करायच्या प्रक्रियेचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे.

चालू वर्षी जानेवारी महिन्यातद पिंपळे वाघिरे येथील ९९५ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. या योजनेतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडाकडून पुणे जिल्ह्यात साडेपाच हजारांहून अधिक नागरिकांना सोडतीद्वारे सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे आर्णि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तब्बल तीन  हजार सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील म्हणाले, ‘अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी सोडत जाहीर होणार असून प्रधानमंत्री आवास योजना तसेच म्हाडाच्या विविध योजनेतील १७०० सदनिका, सर्वसमावेशक योजनेंतर्गत (२० टक्के) १३०० अशा एकूण तीन हजार सदनिकांसाठी ऑनलान सोडतीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leaving mhada for three thousand houses akp

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या