लोकसत्ता प्रतिनिधी पिंपरी : ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझे नाव घेतल्यानंतर मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माझे नाव मागे घेण्याची विनंती केली. पण, त्यांनी घेतले नाही. माझ्या समर्थकांनी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढची प्रक्रिया पोलीस करतील. कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. देसाई यांनी बालेवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. या वेळी देसाई यांना ललित पाटील प्रकरण, सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप या बाबत प्रश्न विचारण्यात आले. आणखी वाचा-मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने मांडणी न केल्याची चौकशी आवश्यक, शंभूराज देसाई यांची मागणी देसाई म्हणाले, की अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्याशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कसलाही संबंध नाही. मी त्याला कधी बघितले नाही. काळा की गोरा मला माहिती नाही. मी त्याला ओळखत नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी माझे नाव घेतल्यानंतर मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माझे नाव मागे घेण्याची विनंती केली. पण, त्यांनी घेतले नाही. माझ्या समर्थकांनी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढची प्रक्रिया पोलीस करतील. कायदेशीर कारवाई केली जाईल.