scorecardresearch

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना

जखमी अवस्थेतील वाबळे दाम्पत्याला तातडीने मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

leopard attacks couple on motorcycle

नारायणगाव : बिबट्याने दुचाकीस्वार दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द गावात घडली. दैव बलवत्तर हाेते दुचाकीस्वार दाम्पत्य बचावले. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील पोपट वाबळे (वय ३०), त्यांची पत्नी नमिता (वय २६) मंचरमध्ये नोकरी करतात. मंगळवारी सायंकाळी सायंकाळी सातच्या सुमारास वाबळे दाम्पत्य दुचाकीवरुन निघाले होते.

हेही वाचा >>> “…तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते”; कायदेतज्ज्ञांचं मोठं विधान

त्या वेळी चांडोली खुर्द गावाजवळ अचानक बिबट्याने दुचाकीस्वार वाबळे दाम्पत्यावर झडप टाकली. दुचाकीस्वार पोपट यांचे नियंत्रण सुटले आणि वाबळे दाम्पत्य घसरुन रस्त्यात पडले. अपघातानंतर दुचाकी घसरल्याने मोठा आवाज झाल्याने बिबट्या पसार झाला. अपघातात नमिता यांच्या डोक्याला दुखापत झाली. दुचाकीस्वार पोपट यांच्या पायाला दुखापत झाले.

अपघातानंतर चांडोलीतील ग्रामस्थ गणेश अभंग आणि नागरिकांनी धाव घेतली. जखमी अवस्थेतील वाबळे दाम्पत्याला तातडीने मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनधिकाऱ्यांनी वाबळे दाम्पत्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 22:56 IST
ताज्या बातम्या