scorecardresearch

पुणे : अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद

तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

पुणे, बिबट्या, Pune City, Ahire village, Leopard , forest department
पुणे : अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : एकनाथ शिंदेंच्या भाषणाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

हेही वाचा… पुण्याच्या आंबेगाव परिसरात बिबट्याचा पुन्हा दुचाकीस्वार दाम्पत्यावर हल्ला; गरोदर महिला जखमी; महिन्याभरातील दुसरी घटना

सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला होता, याबाबतची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वन निभागाची रेस्क्यू टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी बिबट्या सुरुवातीला पत्राच्या शेड मध्ये होता. त्यानंतर तो तेथूनच दुसर्‍या शेडमध्ये लपून बसला. तेव्हा चारही बाजूने जाळी लावत आणि योग्य नियोजन केल्यावर तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या