scorecardresearch

पुणे: मर्सिडीज कंपनीत शिरला बिबट्या; परिसरात खळबळ; सात तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर जेरबंद

बिबट्याल्या पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून तेथील कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.

चाकण MIDC मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याने एकाच खळबळ उडाली आहे. आज पहाटेच्या सुमारास बिबट्या कंपनीत शिरला असल्याचं काही नागरिकांनी पाहिलं, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी खबरदारी म्हणून वनविभागाला माहिती दिली आहे. मर्सिडीज कंपनीतील बॉडी शॉप येथे बिबट्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिलीय. बिबट्या पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून तेथील कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच च्या सुमारास मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरला होता. याबाबत ची माहिती म्हाळुंगे पोलीस आणि वनविभाग यांना देण्यात आली होती. तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्या जेरबंद (पिंजऱ्यात) करण्याचे शर्थीचे प्रयत्न वनविभाग आणि पोलिसांनी सुरू केले. दरम्यान, साडेअकराच्या सुमारास बिबट्याला बेशुद्धीच्या इंजेक्शन चा मारा करून पकडण्यात आलं. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे. बिबट्या मर्सिडीज कंपनीत शिरला अशी माहिती परिसरात पसरताच बघ्यांची गर्दी कंपनीच्या परिसरात झाली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard found in chakan midc area mercedes company vsk 98 kjp

ताज्या बातम्या