दत्ता जाधव, लोकसत्ता

भाग ७

pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

पुणे : राज्यभरात सिंचनाच्या सोयी वाढल्याचा परिणाम म्हणून कडधान्य, तृणधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रात वेगाने घट झाली आहे. शेतकऱ्यांकडून मागणीच होत नसल्यामुळे बाजारात बियाणांची उपलब्धताही कमी दिसून येते.

राज्यभरात सिंचनाच्या सोयी वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून सर्वदूर चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. पाण्याची टंचाई असलेल्या माणदेश, (माण, खटाव, आटपाडी, जत, सांगोला) मराठवाडा, वऱ्हाड आणि विदर्भातील पीक पद्धतीत मोठा बदल घडून आला आहे. त्यामुळे पांरपरिक बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, उडीद, सूर्यफुल, जवस, करडईसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे क्षेत्र घटले आहे. या क्षेत्रात घट होऊन माणदेशात डाळिंब, द्राक्षे, विदर्भात संत्रा, मोसंबी, मराठवाडय़ात कांदा, सोयाबीन, हळद, वऱ्हाडात सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि कमी उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. याचा परिणाम म्हणून पारंपरिक कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियांच्या बियाणांच्या बाजारातील मागणीत वेगाने घट झाली आहे. परिणामी बाजारात या पिकांच्या बियाणांची उपलब्धता घटली आहे.

विदर्भ, वऱ्हाड, मराठवाडय़ात विविध प्रकारची बियाणे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगण आदी राज्यांतून आणली जातात. त्यांचा दर्जा, शुद्धता हा प्रश्न नेहमीच दुर्लक्षित राहतो. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीला सामारे जावे लागते.

महाबीजकडील साठाही घटला

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील (महाबीज) तृणधान्ये, कडधान्ये, तेलबियांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. महामंडळ स्वायत्त असल्यामुळे आर्थिक गणित सांभाळावे लागते. त्यामुळे बाजारात मागणी नसलेले बियाणांचे उत्पादन करून तोटय़ाचा व्यवहार कोण करणार? गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी सुमारे आठ हजार िक्वटल मुगाचे बियाणे आम्ही तयार करीत होतो, यंदा केवळ पंधराशे िक्वटल बियाणे तयार केले. त्यालाही मागणी नव्हती. भविष्यात तेलबियांची बियाणे गरजेइतकी तयार करण्याचे नियोजन आहे, असेही महाबीजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

तृणधान्य, कडधान्ये, तेलबियांचे क्षेत्र कमी झाले आहे. शेतकरी सलग पेरणी न करता बांधांवर, मुख्य पिकाच्या भोवती जवस, करडईची पेरणी करतात. त्यासाठी घरातील बियाणेच वापरतात. तृणधान्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. पण, भविष्यात तृणधान्य आणि तेलबियांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागणी वाढताच बियाणांची उपलब्धताही वाढेल. पण, बियाणे नाहीत म्हणून पेरणीस अडथळा आला आहे, असे चित्र राज्यात नाही. पारंपरिक, घरगुती बियाणांचा वापर राज्यात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतो.          

– विकास पाटील, संचालक (विकास आणि विस्तार)