पुणे : पुणे , पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात स्वातंत्र्यदिनाला हलक्या पावसाने हजेरी लावली. ध्वजारोहणाला सकाळच्या वेळेत मात्र पावसाने उघडी दिली होती. त्यामुळे शहरातील कार्यक्रम पावसाच्या अडथळ्याविना उत्साहात पार पडले. दुपारनंतर मात्र शहरात पावसाला सुरुवात झाली. घाट विभागात पावसाचा जोर मोठा होता. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार शहर आणि परिसरात मंगळवारीही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे सध्या दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. पुणे शहर आणि परिसरातही पाऊस होतो आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनाला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार बहुतांश भागात सोमवारी सकाळपासून पावसाची हजेरी होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light rain in pune city and area the flag hoisting was unhindered pune print news asj
First published on: 15-08-2022 at 19:36 IST