मुकुंद संगोराम

पुणे महानगरपालिकेचे त्या वेळचे आयुक्त स. गो. बर्वे यांनी १९५२ मध्ये सर्वसाधारण सभेत, बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्याच्या रुंदीकरणाचा आयुक्तांचा ठराव आणला होता त्या वेळी, कशाला हवी ती रस्तारूंदी, काय रणगाडे न्यायचेत काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करून त्या वेळच्या नगरसेवकांनी बहुमताने तो ठराव फेटाळला. आज सत्तर वर्षांनी काय परिस्थिती ओढावली आहे, ते आपण सगळे पाहतोच आहोत. आज तर त्याहूनही भयावह अशा संकटात अख्खे शहर सापडते आहे आणि त्याचा सारा दोष आजवरच्या नगरसेवकांचा आहे, याची प्रत्येक पुणेकराने खात्रीपूर्वक नोंद करायला हवी. गेल्या आठवड्यात आणि गेले दोन दिवस पुण्यात पावसाने जो हाहाकार उडवला आहे, त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांचे पितळ पाण्यात तरंगते आहे. लक्ष्मी रस्त्याला विरोध करतानाच गणित मांडून रस्त्याखाली असलेली मैलापाणी वाहून नेण्याची व्यवस्था इतकी कुजवली, की आता सारे शहर म्हणजे पावसाने तयार केलेला तुरुंग बनला आहे. सिमेंटीकरणाचा धडाका लावताना, रस्त्याखालील पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या आणि पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या सुरक्षित राहतील याची काळजी न घेतल्याने हे सारे दुष्परिणाम शहर भोगते आहे. एवढा पाऊस कशाला पडेल या शहरात, असे सांगत त्यावर पाणी फेरण्याचे प्रयत्न होतील. मात्र, याहून कमी पाऊस पडला तरी शहरातील अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यातही अपयश आलेले आहे, हे विसरता कामा नये.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

हेही वाचा >>>पुणे : फळभाज्यांचे भाव कडाडले ; परतीच्या पावसाचा फटका

दिवाबत्ती, चकाचक रस्ते, समाजमंदिरे, सुशोभीकरणाच्या नावाखाली लाज वाटावी अशी उधळपट्टी, हे सगळ्या नगरसेवकांचे आवडते विषय. कारण हे सगळे दिसणारे आहे, त्याने मतदारांचे डोळे दीपून जातात. रस्त्याखाली केलेले काम कुणाला दिसणार आहे थोडेच, असला मूर्ख समज करून घेतल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याची यंत्रणाच उभारली गेली नाही. रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यावरच तुंबून राहते आणि त्यात पुणेकरांना जिवाची पर्वा न करता प्रवास करावा लागतो. गुडघाभर पाणी आता कमरेपर्यंत आले आहे, ते या नादानपणामुळे लवकरच नाकातोंडात जाईल. गेल्या काही वर्षांत तर पुण्याचा तोरा इतका कोमेजला आहे, की हे शहर राहण्यायोग्यच उरलेले नाही. सुशोभीकरणाच्या नावाखाली प्रशस्त पदपथ करून ठेवल्याने सकाळ-संध्याकाळ सारे शहर चाकांवर स्तब्ध होते. त्यात पावसाचा कहर झाला तर त्या चाकांखालचे पाणी नाकातोंडातच जायची शक्यता. स्थानिक सार्वजनिक वाहतुकीची बोंब झाल्याने, शहरात माणसांच्या संख्येपेक्षा वाहनांची संख्याच अधिक.

हेही वाचा >>>समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

शहरात शिवाजीनगर भागात ८० मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने कमरेपर्यंत पाणी साचले. नशीब असे, की एवढा पाऊस शहरात अन्यत्र पडला नाही. मात्र सोमवारी रात्री सारे शहर पावसाने धुवून काढले. रस्त्यात वाहने अडकली, वीजपुरवठा बंद झाला, घरी पोचतो की नाही, या काळजीने भयभीत झालेल्यांना कुठून या शहरात आलो, असे वाटू लागले. सगळेच रस्ते जलमय होतात, याचा अर्थ कोणत्याही भागात पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नाही असा होतो. याबद्दल सार्वजनिक नाही, तरी खासगीतही कोणताही राजकीय नेता हळहळसुद्धा व्यक्त करीत नाही. हे सारे आपल्याच अगाध कर्तृत्वाचे विषारी फळ आहे, याची पुरेपूर जाणीव असूनही मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष देणाऱ्या अशा नगरसेवकांनाच आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो आणि अशा भयग्रस्त वातावरणात त्यांना फक्त शिव्यांची लाखोली वाहतो. एवढा पाऊस कशाला पडेल शहरात, असला बावळट समज करून घेणारे नगरसेवक या शहरात निवडून येतात, ते प्रशासनाच्या मदतीने वाट्टेल तसे निर्णय घेतात, याची खरेतर पुणेकरांनाच लाज वाटायला लागली आहे. शहरातील नाल्यांवर शेकडो बांधकामे नगरसेवकांच्या मूक संमतीशिवाय होऊ शकतील?

हेही वाचा >>>भाज्या आणखी महाग ; परतीच्या पावसाने पिके पाण्यात; आवक घटली

सिमेंटचे रस्ते सपाट करून ठेवताना असे रस्त्यावर पाणी राहू नये म्हणून रस्ते अर्धगोलाकार करायला हवेत, हे शेंबड्या पोरालाही कळेल, मात्र ते फक्त वयाने मोठे झालेल्यांना मात्र कळू शकत नाही. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पन्हाळी करून पाणी नेण्याची व्यवस्था करण्याचे पालिकेतील अतिशिक्षित अधिकाऱ्यांनाही सुचू नये, हा तर निर्लज्जपणा झाला. उद्या शहरात सगळीकडे एकाचवेळी ८० मिलिमीटर एवढा पाऊस झाला, तर सारे शहर अक्षरश: वाहून जाईल, हे कंठशोष करून सांगणाऱ्यांच्या तोंडावर थुंकणाऱ्यांना आपण नेते मानतो, ही आपलीच चूक. एवढा पाऊस पुण्याने कधी पाहिला नसेल, तर येत्या भविष्यात तसा तो पडेल, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे. ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही. परंतु त्यासाठी शहर म्हणजे काय, त्याच्या गरजा कोणत्या असतात, नियोजन कशाला म्हणतात, विकास कशाशी खातात हेच न कळणाऱ्यांच्या हाती शहराच्या नाड्या असतील, तर या शहराचा नायनाट होईल नाहीतर काय?

दिवाळी पहाटचे कार्यक्रम, घरोघरी फराळाचे डबे, घरपोच प्लास्टिकचे डबेडुबे, फुकट चारधाम यात्रा असल्या बिनडोक कार्यक्रमात गुंतून राहिल्याने निवडून येता येते, याची हमी आपण मतदारच देणार असू, तर आपले वर्तमानच कुजलेले राहील, याची खात्री बाळगा. या शहराचे आता याहून अधिक मातेरे होण्याची शक्यता नाही. जे करायचे, ते करून झाले आहे. आता हे शहर उजाड होण्याची वाट पाहणे फक्त बाकी आहे.

mukund.sangoram@expressindia.com