पुणे : पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात आहे. इथेनॉलबाबत जगभरात वेगवेगळे प्रयोगही सुरू आहेत. त्यामुळे इथेनॉल या विषयावर समग्र चर्चा होण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे उद्या (२६ डिसेंबर) पुण्यात ‘लोकसत्ता इथेनॉल परिषद २०२२’ आयोजित करण्यात आली आहे. इथेनॉलच्या वापराला चालना देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगभरात उसाच्या रसापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण सर्वाधिक आहे. इथेनॉल निर्मिती क्षमताही सातत्याने वाढत आहे. त्याबरोबरच कुजलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाल्यासह अन्य कृषी अवशेषांपासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातील इथेनॉल निर्मितीचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक खिडकी योजनासारखे उपक्रमही राबवले जात आहेत. साखर कारखानदारीत आघाडीवर असलेले महाराष्ट्र इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर आहे. येत्या काळात इथेनॉल उद्योगाचे भविष्य, या उद्योगापुढे असणाऱ्या अडचणी, नव्या संधी, या बाबत चर्चा करण्यासाठी इथेनॉल परिषद होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

मुख्य प्रायोजक एस एस इंजिनीअर्स
सहप्रायोजक -युनिव्हर्सल फोर्सेस, मोज्ज इंजिनीअिरग सिस्टिम्स लि.
बँकिंग पार्टनर- बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
पॉवर्ड बाय-इंडियाना सुक्रोटेक (पुणे) प्रा. लि.
सपोर्टेड बाय-श्रीपती शुगर्स अँड पॉवर लि., डफळापूर, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल., श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ