पुणे : लोकसत्ता लोकांकिका आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत डीईएस पुणे विद्यापीठाच्या ‘चिंता करितो विश्वाची’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकावर नाव कोरत महाअंतिम फेरीत धडक मारली. तर भारती विद्यापीठाच्या फाइन आर्ट महाविद्यालयाच्या ‘लाजाळू’ या एकांकिकेने द्वितीय, तर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘आठवडे बाजार’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला

महाविद्यालयीन नाट्यविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या लोकसत्ता लोकांकिकाच्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरी टिळक स्मारक मंदिर येथे झाली. ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी गिरी, अभिनेता गिरीश परदेशी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. वैविध्यपू्र्ण विषयांचे अत्यंत ऊर्जेने सादरीकर करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नाट्यप्रेमी प्रेक्षकांनी अंतिम फेरीला भरभरून प्रतिसाद देत एकांकिका सादरीकरणाचा आनंद घेतला. ‘आव्वाज कुणाचा’ अशा आरोळ्या, टाळ्यांच्या प्रतिसादाने नाट्यगृह दणाणून गेले. विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या एकांकिकेला डिसेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुण्याचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळणार असल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.

विभागीय अंतिम फेरीत डीईएस पुणे विद्यापीठाच्या ‘चिंता करितो विश्वाची’ या एकांकिकेने तीन वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या एकांकिकेला १९ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. तर भारती विद्यापीठाच्या फाइन आर्ट महाविद्यालयाच्या लाजाळू एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिकासह दोन वैयक्तिक पारितोषिके, तर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार एकांकिकेने सांघिक तृतीय पारितोषिकासह पाच वैयक्तिक पारितोषिके मिळवली.

सविस्तर निकाल

सर्वोत्कृष्ट एकांकिका

प्रथम – चिंता करितो विश्वाची (डीईएस पुणे विद्यापीठ)

द्वितीय – लाजाळू (भारती विद्यापीठाचे फाइन आर्ट्स महाविद्यालय)

तृतीय – आठवडे बाजार (अण्णासाहेब मगर महाविद्यालय)

भारती विद्यापीठाच्या फाइन आर्ट महाविद्यालयाचा संघ
भारती विद्यापीठाच्या फाइन आर्ट महाविद्यालयाचा संघ (फोटो- लोकसत्ता टीम)
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा संघ
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा संघ (फोटो- लोकसत्ता टीम)

वैयक्तिक पारितोषिके

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संस्कार फडके (आठवडे बाजार)
सर्वोत्कृष्ट लेखक – नीरज जोशी (चिंता करितो विश्वाची)
सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री – स्वानंदी भारतात (लाजाळू)

उत्तेजनार्थ – दिशा उपाध्ये (स्कीम – शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष – नीरज जोशी (चिंता करितो विश्वाची) उत्तेजनार्थ – शिवकुमार घोडेस्वार (लाजाळू), अमेर राजमाने (आठवडे बाजार)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – छगन डमरे (आठवडे बाजार)
सर्वोत्कृष्ट संगीत – तनय मिठारी (चिंता करितो विश्वाची), संस्कार फडके (आठवडे बाजार)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – पुष्कर देशपांडे (ईमान)

विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिका

  • मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड : नातीगोती
  • भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स : लाजाळू
  • शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय : स्कीम
  • सर परशुरामभाऊ महाविद्यालय : ईमान
  • डीईएस पुणे विद्यापीठ : चिंता करितो विश्वाची
  • अण्णासाहेब मगर महाविद्यालय : आठवडे बाजार

  • मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
  • सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
  • सहप्रायोजक : ‘एनकेजीएसबी को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स’
  • पॉवर्ड बाय : एन. एल. दालमिया, लागू बंधू ज्वेलर्स
  • सहाय्य्य – अस्तित्व
  • टॅलेंट पार्टनर – आयरिस प्रोडक्शन