५१वी आवृत्ती बाजारात; ६० वर्षांत सव्वा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘फकिरा’ या अजरामर कलाकृतीचे वाचकांवर गारूड अजूनही कायम आहे. खपाचे सीमोल्लंघन गाठणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीची ५१वी आवृत्ती बाजारात आली असून गेल्या ६० वर्षांत या कादंबरीच्या सव्वा लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘फकिरा’ या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीची पहिली आवृत्ती मार्च १९५९ मध्ये अभिनव प्रकाशनच्या वा. वि. भट यांनी प्रकाशित केली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अण्णा भाऊ साठे यांनी ही कलाकृती अर्पण केली असून ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभली होती. दुसऱ्या आवृत्तीपासून हे पुस्तक सुरेश एजन्सी या प्रकाशन संस्थेकडे आले. सुरेश एजन्सीने जून १९६१ मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली होती. त्यानंतर गेल्या ६० वर्षांत सुरेश एजन्सीने ‘फकिरा’ कादंबरीच्या ५१ आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. आतापर्यंत ‘फकिरा’ कादंबरीच्या सव्वा लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे, अशी माहिती सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांनी दिली. माझ्या आजोबांनी प्रकाशित केलेली ही कादंबरी प्रकाशक या नात्याने तिसऱ्या पिढीमध्ये मी प्रकाशित करत आहे, असे त्यांनी सांगितले.

‘फकिरा’ कादंबरीची ५१वी आवृत्ती डीलक्स स्वरूपात प्रकाशित केली असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शंभर रुपयांमध्ये ‘फकिरा’ अशी सवलत देण्यात आल्यामुळे करोनाकाळातही दहा दिवसांमध्ये दोन हजार प्रतींची विक्री झाली. आता ५२वी आवृत्ती दिवाळीमध्ये वाचकांच्या भेटीस येत आहे, असे कारले यांनी सांगितले.

वास्तव, अनुभव आणि प्रतिभा असा त्रिवेणी संगम झाल्यावर किती श्रेष्ठ दर्जाची कलाकृती निर्माण होऊ शकते, याचे अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी एक ठसठशीत उदाहरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही कृती अर्पण करून अण्णा भाऊ साठे यांनी मोठेच औचित्य साधले आहे. स्वकीयांची सावकारशाही आणि परकीयांची साम्राज्यशाही यांना फकिराने दिलेली झुंज १९४२च्या प्रतिसरकारशी नाते सांगणारी आहे, यात संशय नाही. समग्र गावगाडा उभा करण्याचे कसब अण्णा भाऊ साठे यांच्याइतके कोणालाच साधलेले नाही.         

– डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक (‘फकिरा’ कादंबरीच्या मलपृष्ठावरील अभिप्राय)