पर्यटकांच्या अलोट गर्दीने लोणावळा हाऊसफुल्ल!

ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पाश्र्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटक संख्या वाढू लागल्याने शनिवार व रविवारी येथील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल झाली होती.

ख्रिसमस आणि नववर्षांला काही दिवस शिल्लक राहिले असताना पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा व खंडाळा शहरात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पाश्र्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटक संख्या वाढू लागल्याने शनिवार व रविवारी येथील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल झाली होती. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
ख्रिसमस, नवीन वर्षांचा आनंद साजरा करण्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा, गुजरातसह अनेक राज्यांमधील पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट, बंगले, सेकंड होम फुल होऊ लागली आहेत. तर पर्यटकांच्या स्वागतासाठी शहरातील विविध हॉटेल, खासगी बंगले सज्ज झाले असून सर्वत्र मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. न्यू इयर सेलिब्रेशनच्या आठवडाभर आदींपासूनच काही ठिकाणी मनोरंजन कार्यक्रम सुरु करण्यात आल्याने लोणावळा पर्यटकांनी बहरु लागला आहे. यामुळे हॉटेल, चिक्की व अन्य लहान-मोठय़ा व्यावसायिकांमध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. पर्यटकांनी लायन्स पॉइर्ंट, अ‍ॅम्बे व्हॅली, टायगर पॉइर्ंट, पवनानगर, भूशी धरण, राजमाची गार्डन, वॅक्स म्युझियम, नारायणी धाम, दुधिरवे, पवना बोटिंग क्लब, लोणावळा धरण आदी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. पर्यटकांच्या वाहनांनी शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक होत आहे.  शहरात वाहनतळांची कमतरता असल्याने वाहने सर्रास रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणखीच वाढते आहे. त्याबरोबरच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lonavala khandala tourist crowd

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या