नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि काही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून लोणावळा पोलिस देखील सज्ज झालेले आहेत. पर्यटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून नवीन वर्षाचं स्वागत करावं अस आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संदेश बावकर यांनी दिला आहे. 

हेही वाचा- पुणे: छायाचित्र काढत असताना युवतीचा मोबाइल हिसकावून चोरला; सारसबाग परिसरातील घटना

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

काही तासांवर नूतन वर्ष येऊन ठेपलं आहे. यामुळं अवघ्या राज्यभरातून आणि पुणे, मुंबईतून हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. दोन वर्षे करोना असल्यामुळं निर्बंधात नूतन वर्षाचं सेलिब्रेशन केलं. यावर्षी मात्र करोनाच संभाव्य संकट असलं तरी पर्यटक नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आतुर झाले आहेत. पर्यटकांची पाऊल लोणावळ्याच्या दिशेने वळत आहेत. लोणावळ्यात विविध चार ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. लायन्स पॉईंट टायगर पॉईंट इथे देखील पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. पर्यटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून नूतन वर्षाचं स्वागत करावं. हुल्लडबाजी करू नये अन्यथा कठोर पाऊल उचलत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा लोणावळा पोलिसांनी दिला आहे