पुण्यातील लोणावळा येथे सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या दुहेरी हत्येप्रकरणी एका आरोपीला अडीच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान याप्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान या घटनेवेळी आरोपींनी श्रुतीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने खूप आरडा ओरडा केला म्हणून हत्या केली, अशी माहिती देखील समजते. अटक आरोपी लोणावळ्यातील रहिवासी आहे. यासंदर्भात पोलिस उद्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. त्य़ानंतर याप्रकरणातील अधिक माहिती समोर येईल.

श्रृती आणि सार्थक यांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात ३ एप्रिलला विवस्त्र अवस्थेत सापडले होते. हत्येच्या छडा लावण्यासाठी पोलिसांच्या आठ तुकड्या कार्यरत होत्या. पाचशेहून अधिक नागरिकांची लोणावळा पोलिसांनी चौकशी देखील केली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर सात ते आठ दिवसांनी ज्या दुचाकी वरुन श्रुती आणि सार्थक याठिकाणी आले होते ती दुचाकी पोलिसांच्या हाती लागली. मात्र, पोलिसांना तपासात यश येत नव्हते. तपासातील दिरंगाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थांनी कॅडल मार्च काढला होता. तसेच हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी मागणी करत पोलिसांना निवेदन दिले होते. गेल्या महिन्यात सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर एसआयटी टीमची स्थापना करण्यात आली होती. त्या अनुषगाने तपास सुरू होता. त्यानुसार एका आरोपीस अटक करण्यात यश आले आहे. मात्र दुसरा आरोपी कधी सापडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव