पुणे : दुचाकी चोरट्याला पकडले ; सहा दुचाकी जप्त , घरफोडीचा गुन्हा उघड | Lonikand police caught a thief who stole a bike from Nagar Road area pune print news amy 95 | Loksatta

पुणे : दुचाकी चोरट्याला पकडले ; सहा दुचाकी जप्त , घरफोडीचा गुन्हा उघड

नगर रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी पकडले.

पुणे : दुचाकी चोरट्याला पकडले ; सहा दुचाकी जप्त , घरफोडीचा गुन्हा उघड
( संग्रहित छायचित्र )

नगर रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून घरफोडी; तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.लोकेश पाटील (वय २२, रा. केसनंद, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाटील सराईत चोरटा आहे. त्याने नगर रस्ता भागातून दुचाकी चोरल्या होत्या; तसेच घरफोडीचा गुन्हा केला होता. तो केसनंद परिसरात थांबल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.

हेही वाचा >>> पिंपरी : शहरांमध्ये ‘तंटामुक्त सोसायटी’ अभियान राबविण्याची आवश्यकता ; अजित पवार यांची सूचना

चौकशीत त्याने केलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. घरफोडीच्या गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला असून पाटील याच्याकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, विनायक साळवे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत २० लाख लाभार्थ्यांची ग्राहक पडताळणी बाकी

संबंधित बातम्या

मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”
“निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का?”; नाना पाटेकरांनी भर कार्यक्रमात सुनावलं
पुणे जिल्ह्यात ७३ जणांना नव्याने करोना संसर्ग
व्हिडिओ: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला; भरधाव ट्रक आदळला डिव्हायडरवर आणि…
रुग्णांवर ‘रेमडेसिविर’चा दुष्परिणाम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!