सलग अकराव्या दिवशी तापमान सरासरीखाली

पुणे : पुणे शहरामध्ये गुरुवारी राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सलग अकराव्या दिवशी रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली होते. त्यात बहुतांश वेळेला किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली राहिला. त्यात सर्वात नीचांकी किमान तापमान २५ जानेवारीला ८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
Chance of light showers of rain in Palghar and Thane on Monday and Tuesday
पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता
Chance of unseasonal rain in some parts of the state including the country in the next 24 hours
पारा चाळीशी पार…मात्र आता पडणार पाऊस; येत्या २४ तासात…
Wide gap between young women and man in electoral rolls in Jalana
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

हिमालयीन विभागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवसापासून थंडीची लाट आली होती. त्या भागातून थंड वाऱ्यांचे तीव्र प्रवाह राज्याच्या दिशेने येत असल्याने राज्यातही काही भागात थंडीची लाट निर्माण झाली. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र असताना या विभागाच्या जवळ असलेल्या पुणे जिल्हा आणि शहरामध्येही तापमानात मोठी घट झाली. २३ जानेवारीला १७.२ अंश सेल्सिअसवर असलेला रात्रीच्या किमान तापमानाचा पारा एकच दिवसात सुमारे ७ अंशांनी घसरला आणि २४ जानेवारीला थेट १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. त्यामुळे शहर आणि परिसरात अचानक कडाक्याची थंडी अवतरली. त्यानंतर २५ जानेवारीला किमान तापमान १० अंशांखाली जाऊन ते ८.५ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे शहराला हुडहुडी भरली. २५ जानेवारीपासून ३० जानेवारीपर्यंत किमान तापमानाचा पारा ८ ते ९ अंशांच्या आसपासच होता.शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी हलकी थंडी कायम आहे. उत्तरेकडील थंडीची लाट सध्या ओसरली आहे. मात्र, राज्यात अद्यापही कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने रात्री हलका गारवा कायम आहे. त्यात सर्वाधिक गारवा पुणे शहरात असल्याचे गुरुवारी तापमानाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले. गुरुवारी शहरात राज्यातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शहराच्या हवामानाचा अंदाज..

पुणे शहरातील रात्रीचे किमान तापमान सध्या १० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असले, तरी पुढील दोन दिवस ४ आणि ५ फेब्रुवारीला किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांखाली जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे थंडीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ६ फेब्रुवारीपासून मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल. ६ आणि ७ फेब्रुवारीला शहरात दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यानंतर ते पुन्हा निरभ्र होणार आहे. या काळात रात्रीच्या किमान तापमानासह दिवसाच्या कमाल तापमानातही वाढ होणार आहे.