scorecardresearch

Premium

वीस लाख रुपयांचे पाच कोटी करण्याचे आमिष… भोंदूसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

crime
लहान मुलांचा किरकोळ वाद, त्यात मोठ्यांची एन्ट्री अन्

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदूसह साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

crime news
बँक खात्यातून १६ हजार कोटी रुपयांची उलाढाल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
Pavana closed water channel project
पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम बंद; पण पाइप ठेवण्याचे भाडे झाले साडेसात कोटी, जाणून घ्या काय आहे गौडबंगाल?
fraud
गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक
lok adalat recovered 396 crores
लोकअदालतीत एक लाखांहून अधिक दावे निकाली… ३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल

याप्रकरणी तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पुणे: पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची जमीन खरेदी व्यवहारातून आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. पाटीलने शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी पांडे यांची ओळख करुन दिली. आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि तक्रारदार महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करुन देतो, असे आमिष दाखविले.

१३ सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. टाकीतील २० लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले. आरोपींशी महिलेने संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बहुरे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lure of twenty lakh rupees convert into five crores crime against fraudsters and accomplices pune print news rbk 25 mrj

First published on: 30-09-2023 at 12:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×