पुणे : नगर रस्त्यावर लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीवर महाराष्ट्र संंघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
टोळीप्रमुख तानाजी अर्जुन जाधव (वय २२, रा. केसनंद, नगर रस्ता), रोहित राजू माने (वय २१, रा. गुजरवाडी, निंबाळकर वस्ती, कात्रज), ओंकार नरहरी आळंदे (वय २१ ,रा. वडगाव रस्ता, केसनंद, नगर रस्ता) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. तानाजी जाधव याने साथीदारांसह शस्त्राच्या धाकाने लूटमार, दुखापत करणे, मंदिरात चोरी असे गुन्हे केले आहेत.




हेही वाचा – Video: गोष्ट पुण्याची- सावरकरांची फर्ग्युसनमधील खोली ते विदेशी कपड्यांची होळी!
४ मे रोजी जाधव, माने, आळंदे यांनी लोणीकंद-केसनंद रस्त्यावर एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटली होती. जाधव आणि साथीदारांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, प्रशांत कातुरे, सागर कडू यांनी तयार केला होता.
संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाईस मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील २६ गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. सहायक आयुक्त किशोर जाधव अधिक तपास करत आहेत.