आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिल्यानंतर अजित गव्हाणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार महेश लांडगे यांना पराभव दिसत असल्याने अशी वक्तव्य करत असल्याचं अजित गव्हाणे यांनी म्हटलं आहे. अजित गव्हाणे हे पिंपरी- चिंचवड मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित गव्हाणे म्हणाले “आमदार महेश लांडगे यांनी दिलेली तंबी, त्यांनी केलेलं विधान हे पराभवाच्या छायेतून केलं आहे. महेश लांडगे यांनी त्यांचा मूळ स्वभाव समोर आला आहे. महेश लांडगे यांना पराभव दिसत आहे. चऱ्होलीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास दिलेला नाही. महेश लांडगे हे खोटं बोलत आहेत “.
नेमकं आमदार महेश लांडगे काय म्हणाले होते?
भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्याला विरोधकांनी त्रास दिल्याने लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिली आहे. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. विरोधकांनी हे न थांबवल्यास वीस तारखेच्या नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. असा इशारा विरोधकांना महेश लांडगे यांनी दिला आहे. महेश लांडगे हे अत्यंत आक्रमक झाले होते. राजकारण हा माझा पिंड नाही. हे देखील विरोधकांनी लक्षात ठेवावं. असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना एक प्रकारे तंबी दिली आहे.