पुणे : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत असलेले भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांची भेट घेऊन त्यांना आमदारकीचा शब्द दिला. त्यामुळे मुळीक नाराजी दूर ठेवून महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचाराला लागले आहेत.

पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. महायुतीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला आला. या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार असल्याने तेच विधानसभा निवडणूक लढविणार, हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्याला विरोध केला. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी मुळीक विशेष प्रयत्नशील होते.

Assembly Elections 2024 Legislature BJP Raju Parve Nagpur
खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला, आता आमदारकीची अपेक्षा असताना भाजपकडून ऐनवेळी…
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?
vidhan sabha election 2024 osmanabad assembly constituency rebel in mp omraje nimbalkar house
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरातूनच बंडखोरी?
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Dhananjay Munde
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, २०१९ मध्ये तिघांचीच नोंद; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट
Shiv Sena Shinde faction sent AB applications by helicopter to Deolali and Dindori shocking NCP
शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी

हेही वाचा >>> एक काळ असा होता…

या मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी भाजपने आमदार पंकजा मुंडे यांच्यावर दिली होती. मुंडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, ‘मुळीक उमेदवार नसतील, तर महायुतीचे काम करणार नाही,’ असा थेट इशाराच दिला होता. उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत टिंगरे आणि मुळीक दोघांकडेही पक्षाने दिलेले ‘एबी’ फॉर्म होते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुळीक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले होते. अर्ज भरण्यासाठी शेवटची काही मिनिटे बाकी असताना फडणवीस यांनी त्यांना फोन करून अर्ज दाखल न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल न करता मुळीक घरी परतले. त्यांचे कार्यकर्ते आणि वडगाव शेरीमधील भाजप पदाधिकारी यावर नाराज होते. मुळीक यांना उमेदवारी न दिल्याने टिंगरे यांचा प्रचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

हेही वाचा >>> पिंपरी : ‘याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती’; पंकजा मुंडे यांचा हल्ला

दरम्यान, दिवाळीच्या काळात फडणवीस यांनी पुण्यात येऊन सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मुळीक यांच्या घरी जाऊनदेखील फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नाराजी दूर केली. ‘पक्षाच्या वतीने तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल,’ असा शब्द फडणवीस यांनी मुळीक यांना दिला. हा ‘शब्द’ मिळाल्याने मुळीक यांची नाराजी दूर झाली.

नाराजी दूर; प्रचारात सहभाग वडगाव शेरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. ‘वडगाव शेरीला टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून, या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ,’ असा विश्वास मुळीक यांनी या वेळी व्यक्त केला.

Story img Loader