पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते, मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत. बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत. हेही वाचा : पिंपरी : बांगलादेशी घुसखोरांच्या सुटकेसाठी बनावट जामीन; वकिलावर गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतील रणनीतीविषयीचे मार्गदर्शन अधिवेशनात केले जाणार आहे. त्या दृष्टीने राज्यभरातील सहा हजारांहून अधिक कार्यकर्ते दाखल झाले आहेत.