scorecardresearch

केंद्रातील आणि राज्यातील सरकारला महागाई कमी करण्याची गणरायांने सद्बुद्धी देवो, हीच गणरायाकडे माझी प्रार्थना : नाना पटोले

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विश्वजीत कदम यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीच दर्शन घेतले.

केंद्रातील आणि राज्यातील सरकारला महागाई कमी करण्याची गणरायांने सद्बुद्धी देवो, हीच गणरायाकडे माझी प्रार्थना : नाना पटोले
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.

देशभरात गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे.त्यामध्ये पुणे शहराच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच ओळख असून त्या पार्श्‍वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विश्वजीत कदम यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीच दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील केली.त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शहरातील गणपती मंडळांना भेट देत दर्शन घेतले.तर त्याच दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.यावेळी त्यानी अनेक प्रश्नावर भाष्य देखील केले.

हेही वाचा >>> “तुम्हाला माहितच आहे, सरकारच्या पाठिशी…;” अमित शाह यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

यावेळी नाना पटोले म्हणाले की, गणेशोत्सव साजरा होत आहे. हा आनंदाचा दिवस आहे.आपल्या सर्वांसमोर महागाई हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे.मी विघ्नहर्त्याला प्रार्थना करतो की, केंद्रात आणि राज्यात जे सरकार बसल आहे. त्यांना गणरायांने  सद्बुद्धी  देवो आणि महागाई कमी हो, हीच गणरायाकडे माझी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्याकडून राज ठाकरे यांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले की,कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो. हे आपण बघतच आलो आहे.हेच लोकं आधी १० वेळा मातोश्रीवर भेटायला जात होते.त्यामुळे मी यात पडणार नाही.

माझ्या या सरकारकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की महागाई कमी करा, कारण देशात जर सगळ्यात जास्त महागडे राज्य कुठला असेल तर तो महाराष्ट्र आहे. तसेच हे अजूनही राज्य सरकार हार तुर्‍यांमध्येच आहे.राजकीय घडामोडी घडवण्यासाठी कोण शिवतीर्थावर जातं किंवा कोण मातोश्रीवर जातं याचं आम्हाला देणंघेणं नाही.लोकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून सत्तेचा माज आणून असे वागत आहेत. यांचा माज उतरवायला जनता मागे पुढे बघणार नाही.त्याच बरोबर सध्या अनेक विधान भाजपच्या नेत्याकडून केली जात आहे.पण कोण कुठली महापालिका जिंकेल हे येणारा काळ सांगेल असे सांगत शिंदे आणि फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra congress chief nana patole took darshan of first kasba ganpati in pune zws 70 svk88