पुणे : राज्यातील १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी सायंकाळी गृहविभागाचे सचिव संदीप ढाकणे यांनी दिले. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे: कल्याणीनगर चौकात तरुणाला चिरडून पसार झालेला ट्रकचालक सात महिन्यानंतर अटकेत

महामार्ग पोलीस दलाच्या पुणे विभागाच्या पाेलीस अधीक्षक लता फड यांची राज्य गुप्तवार्ता विभागात (छत्रपती संभाजीनगर कार्यालय) उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा दलाच्या पुणे विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.