अपघाताने हात निकामी होऊनही डगमगून न जाता त्याने चक्क पायाने उत्तरपत्रिका लिहून बारावीची परीक्षा दिली आणि उत्तम यशही मिळवले. पुण्यातील सोहेल शेख या मुलाची ही गोष्ट. वाणिज्य शाखेतून बारावी झालेल्या सोहेलला प्रथम श्रेणी मिळाली आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर पायाने उत्तरपत्रिका लिहिणारा सोहेल औत्सुक्याचा विषय ठरला. राज्य मंडळाने लेखनिक घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला असतानाही आपली परीक्षा आपणच देण्याचा निर्णय त्याने घेतला. सोहेलला या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली आहे. एकूण ६५० पैकी ४७६ गुण म्हणजेच ७३ टक्के मिळाले .
बारावीसाठी ब्रेल लिपीची पुस्तके उपलब्ध न झाल्याने श्राव्य पुस्तकांच्या साहाय्याने अभ्यास केला. यावेळी वरळी येथील नॅब संस्थेची खूप मदत झाली. जास्तवेळ मी स्व-अभ्यासाला दिला . दहावीत मला ८०.४० टक्के मिळाले होते त्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत ७३.८५ टक्के आहेत.
दृष्टिहीन विद्यार्थी निखिल भालेराव, रूईया महाविद्यालय,