पुणे : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने सायंकाळी दिले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे पोलीस दलातील परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

गृहविभागाने सोमवारी सायंकाळी याबाबतचे आदेश दिले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीआयडी) पुणे कार्यालयात महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) मुंबई कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. एम. रमेश यांची गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीकांत धिवरे यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.