हिंद केसरी पै.अभिजीत कटके आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे या दोन्ही विजेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात बुलेट,सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनल विशेष चर्चेत राहिली असून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाली.यामध्ये गुण देण्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.हाच मुद्यावर अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत म्हणाले की,महाराष्ट्रसह उत्तर भारतातील अनेक मल्लांना पराभवाच पाणी पाजणारा लढवय्या असा सिकंदर शेख आहे. अखेरच्या सामन्या पर्यन्त अनेक मल्ल लढले आहेत.त्यामुळे कोण कोणापेक्षा भारी हे म्हणून चालणार नाही. तसेच समाजात सिकंदर शेखवरून काही जण द्वेषाचे राजकारण करित आहेत.जातीय स्वरुप दिल जात आहे.पण प्रत्येक मल्लचा धर्म,जात ही केवळ कुस्तीचा आखाडा असतो.त्यामुळे त्यांना जातीपातीच लेबल लावता कामा नये.तसेच खेळाला बदनाम करू नका. अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा >>> “आजपासून तुझं नाव गांजा काळे”; गजानन काळेंच्या ‘त्या’ विधानावर अभिजीत बिचुकलेंचं प्रत्युत्तर; राज ठाकरेंचाही केला उल्लेख!

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…
Tension over seat allocation in Mahavikas Aghadi lok sabha election 2024
जागावाटपात शिवसेना, राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी; महाविकास आघाडीत पाच जागांवरून तणाव

यावेळी अजित पवार म्हणाले की,कुस्ती या खेळाने देशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. देशाची आणि राज्याच नाव हिंद केसरी अभिजीत कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी ऑलिंपिक आपल नाव झळकाव. तिथे राष्ट्रगीत वाजल पाहिजे.अशी आमची सर्वांचीच भावना आहे. आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.कुस्तीमध्ये कधीचं राजकरण आणणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की,आज या विजेत्या स्पर्धकांना बुलेट देत आहोत.मी दोघांना विचारले की,बुलेट चालविता येते का ? तर त्यावर दोघे म्हणाले की,आम्हाला चालवता येत नाही.दोन्ही हाताने उचलून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.असे अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला. हे दोघे ही इतके ताकदवर असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तरुणाचा खून; पोलिसांनी केली तिघांना अटक

तसेच ते पुढे म्हणाले की,पुण्यात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली.यावरून चर्चेचा धुरळा उडाला.त्यामध्ये कधी अंगाला माती न लावलेले.कधी लंगोट न घातलेले.आखाड्यात शड्डू न ठोकलेले.तसेच विना लंगोटचे पैलवान यावर आघाडीवर होते.हे खर तर वास्तव असल्याच सांगत टीकाकराना खडे बोल सुनावले. तसेच ते पुढे म्हणाले की,जे खेळतात त्यानीच अधिकारवाणीने बोलण्याची गरज आहे.आमच्या सारख्यांनी तिथे तोंडाची वाफ वाया घालण्याची काही गरज नाही. या प्रकरणी सोशल मीडियावर नुसतीच चर्चेच गुराळ सुरू होते.त्यामध्ये काही दम नव्हता.आखाड्यात उडालेल्या धुराळा अशा चर्चेमुळे झाकोळून जात असल्याच मत त्यांनी व्यक्त केले.