पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षे याने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावल्यानंतर मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर रविवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मूळचा पुणे जिल्ह्याचा, पण नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवराज राक्षे याने ६५ व्या राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५५ वा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान पटकाविला. अंतिम फेरीच्या लढतीमध्ये त्याने आपलाच सहकारी सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला एक मिनिटापेक्षाही कमी वेळेत चीतपट करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पाच लाख रुपये, महिंद्रा थार जीप आणि चांदीची गदा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवराज राक्षे याला ‘महाराष्ट्र केसरी’ बहुमान प्रदान करण्यात आला. हेही वाचा - पुणे : विश्रांतवाडी आरटीओत आग, जप्त केलेली १० वाहने भस्मसात हेही वाचा - पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात ‘मोफा’, सदनिका खरेदी व्यवहारात नऊ कोटींची फसवणूक महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. चांदीची गदा हाती घेतलेल्या शिवराजला पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. ट्रस्टच्या वतीने शिवराजचा सत्कार करण्यात आला.