पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी ; मुंबई पोलीस दलातील शिपायावर गुन्हा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलीस शिपायाच्या विरोधात सोमवारी रात्री विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलीस शिपायाच्या विरोधात सोमवारी रात्री विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई संग्राम कांबळे,असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रारअर्ज देण्यात आला होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरूड येथे पार पडली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?

या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. होते. सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर कांबळे याने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चार गुण बहाल केल्याचा आरोप करून धमकी दिल्याचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी तक्रार अर्जात म्हटले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 03:21 IST
Next Story
जूननंतर देशात आर्थिक मंदीची शक्यता, नारायण राणे यांचे वक्तव्य; जी-२० परिषदेचे उद्घाटन
Exit mobile version