लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : उरुळी देवाची येथील खंडोबामाळ येथे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) उभारण्यात येणाऱ्या धान्य गोदामाच्या जागेचे बांधकाम ग्रामपंचायत स्तरावर ठराव करून बंद पाडले आहे. तसेच, फुरसुंगी येथे खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या धान्य गोदामाच्या जागेचे भाडेदेखील ‘महामेट्रो’ देत आहे. त्यामुळे ‘महामेट्रो’ला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने नवीन जागा शोधून आवश्यक परवानगी प्रक्रिया पार पाडून जागा निश्चित करावी, असे पत्र ‘महामेट्रो’ने जिल्हा प्रशासनाला पाठवले आहे.

‘महामेट्रो’कडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड; तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणारी हिंजवडी ते शिवाजीनगर या तिन्ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. त्या दृष्टीने बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल हब) प्रस्तावित करण्यासाठी शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची जागा घेतली, तर प्रशासनाने सुचविलेल्या जागेवर महामेट्रो स्वतःच्या खर्चाने नवीन धान्य गोदाम बांधून देणार आहे. तोपर्यंत गोदामाच्या ठिकाणच्या जागेचे भाडे ‘महामेट्रो’ भरणार आहे. तीन वर्षांपर्यंत धान्य गोदामासाठी जागा शोधून बांधून देण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानकात ज्येष्ठ, अपंग प्रवाशांची परवड ?

जिल्हा प्रशासनाकडून जागेबाबत यापूर्वीच तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लावण्यात आला आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने उरुळी देवाची येथील सर्व्हे क्रमांक १५१ (खंडोबामाळ) येथील १४ एकर गायरान जागा निश्चित केली. या संदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. ‘महामेट्रो’ने पायाभरणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने ठराव करून हे काम बंद पाडले आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता ‘महामेट्रो’कडून काम बंद करण्यात आले असून, नव्याने जागा शोधण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले आहे, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-कात्रज कोंढवा रस्त्याबाबत मोठी अपडेट, जागा ताब्यात देण्यासाठी आले इतके प्रस्ताव..!

शिवाजीनगर येथील धान्य गोदामाच्या जागेच्या मोबदल्यात सुमारे २४ हजार चौरस फुटांचे बांधकाम, १८०० टनांची पाच-सहा गोदामे तयार करण्याच्या दृष्टीने आराखड्यानुसार जून महिन्यात बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याने हे काम बंद पाडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे नवीन जागेसंदर्भात पत्र पाठवले आहे. -हेमंत सोनवणे, कार्यकारी महासंचालक, महामेट्रो