पुणे : यंदाच्या पावसाळ्यात मंगळवारपर्यंत (१३ ऑगस्ट) राज्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के, तर देशात सरासरीच्या तुलनेत पाच टक्के जास्त पाऊस झाला आहे. सध्या देशात मोसमी पावसाने उघडीप घेतली आहे. महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते १२ ऑगस्ट, या काळात राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. या काळात राज्यात सरासरी ६६९.४ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ८५२.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा >>> राज्यातील पशुधन रोगमुक्त जाणून घ्या, पशुसंवर्धन विभागाने नेमकं काय केलं

activist manoj jarange slams sharad pawar over maratha reservation
”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Supreme Court News
Ladki bahin yojana : “..तर ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ”, महाराष्ट्र सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे
Ajit Pawar
Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…”
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
Kolkata Doctor Murder Case
Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एकूण देशाचा विचार करता याच काळात सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. देशभरात या काळात सरासरी ५६१.९ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५९२.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस तमिळनाडू आणि पुदुचेरीत पडला. तमिळनाडूत सरासरीपेक्षा ९२ टक्के आणि पुदुचेरी येथे ८६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस लडाख या केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांत पडला आहे. त्यात सिक्कीम, दिल्ली, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा समावेश आहे.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल

सरासरीइतक्या पावसाची नोंद १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत; तर सरासरीपेक्षा कमी पाऊस आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत झाला आहे. त्यांत सिक्कीमवगळता ईशान्य भारतातील राज्यांसह बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. मणिपूर येथे सर्वांत कमी- सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी- पाऊस पडला आहे. सध्या राज्यासह देशभरात पावसाने उघडीप दिली आहे. कमाल तापमानातही सरासरी चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महिनाअखेरीस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.