पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीची परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान होणार आहे.

हेही वाचा : पुणे : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचार, परीक्षेची भीती, नैराश्य, मानसिक दडपणाखाली असतात. त्यामुळे राज्य मंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांद्वारे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जाणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्र, बैठकव्यवस्थेबाबत पालक, विद्यार्थ्यांनी समुपदेशकांना प्रश्न विचारू नये अशी सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आली आहे. समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.