पुणे : तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. सुधारित शैक्षणिक वेळापत्रकानुसार शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी जादा तासिका घेऊन अभ्यासक्रम आणि सत्रकर्म पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठ कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : एमपीएससीच्या तीन परीक्षांचा सुधारित अभ्यासक्रम २०२३ पासून लागू

बैठकीदरम्यान नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा आणि शैक्षणिक शिस्त यांचे नियोजन, महाविद्यालयांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल, सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी), वार्षिक प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंडळाने आणि राज्यातील पदविका अभ्यासक्रमाच्या स्वायत्त संस्थांनी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष परीक्षा ३१ मेपर्यंत पूर्ण होतील अशा दृष्टीनेनियोजन करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करावेत, नवीन शैक्षणिक वर्ष २४ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. सुधारित वेळापत्रक https://msbte.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state board of technical education announces revised time table for academic year 2023 pune print news ccp14 zws
First published on: 07-02-2023 at 22:10 IST