scorecardresearch

Premium

पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला १९ जून २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत गांधी स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही.

Mahatma Gandhi memorial Pimpri Chinchwad
पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच (image credit – loksatta graphics/indian express)

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला १९ जून २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत गांधी स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १५४ वी जयंती आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला यांनी १२ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये महापालिकेने किमान दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास गांधी स्मारकाचा संपूर्ण बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती खर्च कंपनी करेल. जागेचा व स्मारकाचा ताबा महापालिकेकडे राहील, असे नमूद केले होते. त्यानुसार बिर्ला ग्रुपला पिंपरीतील सिटी सर्व्हे क्रमांक ४६९४ मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंड व महावितरणच्या उपकेंद्रासाठी आरक्षित असलेले ६८०६ चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करण्यास स्थायीची मान्यता मिळाली आहे.

Bodhi Tree Planting Festival
नाशिक : बोधी वृक्षारोपण महोत्सवात दलाई लामांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग, सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश
old people hunger strike Karanja
वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर
panvel BJP leader Paresh Thakur request DCM Fadnavis relaxation arrears property tax
थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार
panvel Municipal Corporation approved funds for concrete road construction in agm
पनवेल महापालिकेच्या उपनगरांमध्ये कॉंक्रीटच्या रस्ते बांधणीचा श्रीगणेशा; ४२१ कोटींच्या निधीला सर्वसाधारण सभेत मंजूरी

हेही वाचा – “माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत १९ जून २०१९ रोजी पुतळा बांधण्याच्या ठरावाला मान्यता दिली. त्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर भूखंड मंजूर केला आहे. महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने हा भूखंड आदित्य बिर्ला कंपनीच्या ताब्यात दिला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकतीच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आदित्य बिर्ला कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुतळ्याच्या कामासंदर्भात बैठक घेतली. आयुक्तांनी यामध्ये काही सूचना केल्या आहेत. दुसरीकडे बिर्ला ग्रुपने स्मारकाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांच्या स्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक

पिंपरीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडी चौकामध्ये भूखंड मंजूर केला आहे. त्याठिकाणी महात्मा गांधी यांचा पुतळा असेल. तसेच दोन एकरच्या परिसरामध्ये ग्रंथालय, संशोधन केंद्र, गांधी विचार परीक्षा केंद्र, गांधी जीवन दर्शन याबाबतचे प्रसंग चित्रे लावण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून महात्मा गांधींचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती आदित्य बिर्ला कंपनी करणार आहे.

हेही वाचा – वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, २१ लोक ईडीच्या रडारवर होते, ते सत्तेत गेल्याने…

महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी आमचे नियोजन झाले आहे. नुकतेच आयुक्तांना सादरीकरण दिले आहे. त्यांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुतळ्याच्या प्रत्यक्षात कामाला दीड ते दोन महिन्यांत सुरुवात होईल. – किशोर वर्मा, आदित्य बिर्ला ग्रुप

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahatma gandhi memorial work pending for four years in the city of pimpri chinchwad pune print news ggy 03 ssb

First published on: 02-10-2023 at 10:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×