पुणे : महाविकास आघाडीमध्ये शहरातील चार मतदारसंघांवरून तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात त्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. हडपसर, वडगावशेरी, पर्वती आणि खडकवासला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत अद्यापही एकमत झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढविणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, महाविकास आघाडीचे जागा वाटप येत्या दोन दिवसांत निश्चित होणार आहे. मात्र, शहरातील काही जागांबाबतचा पेच कायम आहे.

हेही वाचा – विद्यमान आमदारांना ‘हरियाणा पॅटर्न’चा धसका, उमेदवार बदलणार, की राहणार, याबाबत भाजपचे ‘नवे’ निकष

शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी कसबा, कोथरूड, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ काँग्रेसला मिळणार आहेत. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत, तर शिवाजीगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन्ही मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसने तुल्यबळ लढत दिली होती. कोथरूड मतदारसंघ शिवेसनेला (ठाकरे) मिळणार असल्याचे निश्चित आहे.

हेही वाचा – ‘परिवर्तन महाशक्ती’चे १५० जागांवर एकमत

शिवसेनेकडून (ठाकरे) हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघावरही दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही मागणी अमान्य आहे, तर आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडून पर्वती मतदारसंघाचीही मागणी करण्यात आली आहे. हडपसरच्या बदल्यात शिवेसनेला (ठाकरे) पर्वती मतदारसंघ देण्याची राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची तयारी आहे. मात्र, काँग्रेसला हा मतदारसंघ हवा असल्याने पर्वती मतदारसंघावरूनही तिढा निर्माण झाला आहे. वडगावशेरीवर काँग्रेसने दावा केलेला नाही. मात्र, शिवसेनेकडून (ठाकरे) वडगावशेरी नाही, तर खडकवासला मतदारसंघ द्यावा, असा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे या चार मतदारसंघांचा पेच कायम आहे. उमेदवारी न मिळाल्यास भेगडे अपक्ष लढतील किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून राजकीय जीवनात सक्रिय आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत मला प्रत्येक वेळी थांबविण्यात आले. मात्र, या वेळी मलाच संधी मिळेल. – श्रीनाथ भिमाले

पक्षाकडे काेणतेही पद किंवा महामंडळ मागितले नव्हते. केवळ उमेदवारी मागितली असून, त्यासाठी मी आग्रही आहे. – बापूसाहेब भेगडे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi in dillema regarding four seats in pune pune print news apk 13 ssb