वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा तोडल्याच्या रागातून महावितरणच्या अधिकाऱ्याला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यात अधिकाऱ्याच्या बोटाचे हाड मोडले आहे.याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश विठ्ठल इंडे (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सुशील जालिंदर नवले (वय ३५, रा. नगर रस्ता) याला अटक केली आहे. ही घटना पराशर सोसायटीत बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडे हे महावितरण कंपनीत अधिकारी आहेत.

हेही वाचा >>> निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना दिला आश्चर्याचा धक्का; मराठीत भाषणाला सुरुवात करत म्हणाल्या, “सगळ्या पुणेकर…”

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

शाखा कार्यालयामार्फत ते पराशर सोसायटीत वीजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यासाठी गेले होते. महावितरणचे ग्राहक सुशील नवले यांनी वीजबिल भरले नव्हते. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. त्याचा राग आल्याने नवले यांनी घरातून स्टीलचा रॉड आणून त्याने इंडे यांना मारहाण केली. आमच्या भागात आला तर त्याचे हात-पाय तोडीन, अशी धमकीही त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक पाठक हे करत आहेत