अजित पवार आणि पार्थ पवार यांनी माझं काम केलं. तश्या सूचना त्यांनी खालच्या कार्यकर्त्यांना केल्या, पण त्यांनी माझं काम केलं नाही. त्यांच्यात नाराजी होती, ती शेवटपर्यंत राहिली. त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल. अशी खदखद बारणे यांनी बोलून दाखवली आहे. बारणे हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> Pune Porsche Accident : “ऑनलाईन बिलांवरून स्पष्ट झालंय की…”, ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टकरण

महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी चांगलं काम केलं. त्यामुळं माझा विजय निश्चित होईल, असं ही बारणे यांनी म्हटलं आहे. मी अडीच लाखांचा मताधिक्याने निवडून येईल. असा दावा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, अजित पवार आणि पार्थ पवार यांनी माझं चांगलं काम केलं. कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सुचना केल्या. परंतु, पहिल्यापासून खालचा कार्यकर्ता नाराज होता. ती नाराजी शेवटपर्यंत राहिली. काही कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं. पुढे ते म्हणाले, नेत्यांनी, आमदारांनी चांगलं काम केलं आहे. जे काम करत नव्हते त्यासंबंधी मी अजित पवारांशी बोललो होतो. त्यांना त्यासंबंधी सांगितलं होतं. अस ही बारणे म्हणाले.