पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर नसरापूर फाटा येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे सातारा रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली असून, पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा – पुणे: अपहृत बालकाची तीन लाखांत विक्री, दोघांना अटक; सूत्रधार पसार

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

नसरापूर येथील चेलाडी फाटा परिसरात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची तयारी सुरू असल्याने पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाटा परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. वाहतूक नियोजन करण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.