अपार्टमेंटमध्ये सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारण्याचा निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे अपार्टमेंटमधील कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा निकाल केवळ अपार्टमेंटशी संबंधित असून सोसायट्यांच्या देखभाल शुल्काशी त्याचा कोणताही संबंध नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने अपार्टमेंट कायद्यात सुधारणा करून अपार्टमेंटधारकांना सहकार विभागाकडे दाद मागण्याचा पर्याय खुला केला आहे. जुलै २०२० मध्ये हा निर्णय झाल्यानंतर पुण्यातील अरण्येश्वर भागातील ‘ट्रेझर पार्क’मधील रहिवासी नीलम पाटील, प्रमोद गरड, अतुल इटकरकर, प्रवीण भालेराव आणि नरेंद्र चौधरी यांनी सहकार विभागाचे उपनिबंधक दिग्विजय राठोड यांच्याकडे या विषयावर दाद मागितली. त्यावर राठोड यांनी जुलै २०२१ मध्ये अपार्टमेंटधारकांना देखभाल शुल्क हे अपार्टमेंट क्षेत्रफळानुसार काढण्यात येणाऱ्या अविभक्त हिश्शाच्या टक्केवारीनुसार आकारण्यात यावा, असा निकाल दिला. या निकालाविरोधात ट्रेझर पार्कमधील तीन-चार बीएचके सदनिकाधारकांनी पुण्यातील सहकार न्यायालय क्रमांक दोन येथे दाद मागितली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उपनिबंधकांनी दिलेला निकाल कायम ठेवला आहे. अपार्टमेंट कायद्यातील कलम-दहाप्रमाणे अपार्टमेंटधारकांना देखभाल शुल्क हे सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार आकारण्याचा निर्णय दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maintenance charges equal area apartment flat decision co operative court pune print news amy
First published on: 19-05-2022 at 15:10 IST