‘निरामय’ या संस्थेतर्फे झोपडपट्टीतील मुलींसाठी तीन दिवसांचे उन्हाळी निवासी ‘मैत्री शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शिबिर २५ ते २७ एप्रिल दरम्यान हिंगणे स्त्री शिक्षण संस्था येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये पुण्यातील ११ वस्त्यांमधील १३ ते १८ वयोगटातील ३०० पेक्षा जास्त मुली सहभागी होणार आहेत. शिबिरामध्ये गटचर्चा, व्यायाम, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलींनी केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन, कथाकथन यांसारखे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. २५ एप्रिल रोजी ‘मैत्री’ आणि २७ एप्रिल रोजी ‘नेतृत्व’ या विषयवार गटचर्चा घेण्यात येणार आहे. पुण्यातील १५ तज्ज्ञ चर्चा प्रवर्तक चर्चा चालविणार आहेत.
इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पा रानडे, सोशल इनिशिएटिव्ह फोर्बस् मार्शलच्या संचालक मेघना मराठे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख, दंतवैद्य डॉ. सुप्रिया खेऊर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर हे शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे उद्घाटन २५ एप्रिल रोजी अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या वेळी रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित राहणार आहेत.