पुणे : तरुणींकडे पाहून मोटारचालकाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याची घटना शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनीत घडली. या प्रकरणी मोटार चालकाला अटक करण्यात आली.

प्रणव केदार वझे (रा. माॅडेल काॅलनी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वझे याने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझे हा एका महाविद्यालयाच्या परिसरात मोटारीत येऊन थांबायचा. तेथून जाणाऱ्या तरुणींकडे पाहून तो अश्लील कृत्य करायचा. गेले काही महिन्यांपासून तो मोटार स्त्याच्या कडेला लावून अश्लील कृत्य करत होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याला पकडले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. वझे हा एका निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक वलसे तपास करत आहेत.