लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रभात रस्त्यावर व्यावसायिकाचा मोबाइल चोरुन पसार झालेल्या चोरट्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली. चोरट्याने डेक्कन, तसेच बाणेर परिसरात मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याकडून चार मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

How to block your phone from tracking your location
तुमचं लोकेशन आता कोणीही ट्रॅक करणार नाही? ‘असा’ ब्लॉक करा तुमचा फोन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video of kid babbling in sleep due to mobile addiction how to get rid of mobile parents must watch viral video
पालकांनो आपल्या मुलांना मोबाइलपासून दूरच ठेवा! लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Egg Theft In America
अमेरिकेतील दुकानातून एक लाख अंडी चोरीला गेली, कारण काय?
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?

हबीब अबालू इराणी (वय २४, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता आणि फ्रेंडस रेसीडन्सी, मुंब्रा, जि. ठाणे) असे केलेल्या चोरट्याचे नाव आहे. प्रभात रस्त्यावर एका व्यावसायिकाचा मोबाइल संच इराणीने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन इराणीला सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. इराणी सराइत असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध यवत, लोहमार्ग पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.

आणखी वाचा-पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

त्याने बाणेर भागात एका पादचाऱ्याकडील मोबाइल संच चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून चार मोबाइल संच जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ यांनी ही कामागिरी केली.

Story img Loader