पुणे : सलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे; एकाला अटक

मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.

salon
या प्रकरणामध्ये मुलीच्या आईने तक्रार दाखल केलीय (प्रातिनिधिक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये एका आठ वर्षीय मुलीचे केस कापताना केशकर्तनकाराने अश्लील कृत्य केल्याची घटना घडलीय. चिमुकलीचे केस कापणाऱ्या व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी केशकर्तनकाराला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद शेबु मोहम्मद हानिफ सलमानी असं आरोपीचे नाव असून तो ‘थ्री स्टार’ नावाच्या सलूनमध्ये काम करत होता असं पोलिसांनी सांगितले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत चिखली परिसरातील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले. हेअर कट करत असताना आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याचं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हेअर कट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आई आणि आजीला सांगितला. पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाणे गाठत केशकर्तनकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती पोलीस अधिकारी वसंत बाबर यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man arrested from salon in pimpri chinchwad after he tried to molest 8 year old girl kjp scsg

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या