scorecardresearch

Premium

हिंजवडीत महिलेच्या प्रियकराचा खून; मृतदेह मुळशी धरणात टाकला; पती अटकेत

किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे

woman arrested from madhya pradesh over murder 30 year man
राजस्थानमधील ३० वर्षीय व्यक्तीचा महिलेनं खून केला आहे. ( प्रातिनिधीक छायाचित्र )

पिंपरी : महिलेच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी  हिंजवडी पोलिसांनी पतीला अटक केली असून ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती. बेपत्ता असलेल्या प्रकरणाचा तपास करताना हा प्रकार समोर आला. किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> डीजेच्या लेझर बीममुळे पुण्यातील २३ वर्षीय तरुणाने ७० टक्के दृष्टी गमावली

footwear trader brutally beaten up in dombivli,
डोंबिवलीत चप्पल विक्रेत्याला बेदम मारहाण
48 year old man commits suicide due to wife extra marital affair
सांगली: पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीची आत्महत्या
police take preventive action aagainst gangsters in pune
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांची झाडाझडती
dr narendra dabholkar murder case, cbi submitted evidences and witness to court
सीबीआयकडून साक्ष, पुरावे सादर करण्याचे काम पूर्ण – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

किशोर पवार हा बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल होती. चौकशी दरम्यान पोलिसांना महिलेच्या पतीबाबत संशय आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी बेपत्ता असलेल्या किशोरचा खून केल्याची कबुली त्याने दिली. पत्नीसोबत किशोरचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यातून त्याने किशोरला जीवे मारण्याचा कट रचला. २४ सप्टेंबर रोजी त्याने किशोरला दुचाकीवरून सूसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. तिथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोरच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर किशोरचे हात-पाय बांधून मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man arrested suspected of killing wife boyfriend pune print news ggy 03 zws

First published on: 03-10-2023 at 19:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×