scorecardresearch

चोरट्याने मोबाईल हिसकावला; धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने घेतली उडी ; चोराचा पाठलाग करून पकडले

आरपीएफ ए.के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

mobile theft
जखमी झालेल्या सुनील यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यांच्या खांद्याला मोठी जखम झाली आहे.

चिंचवड : धावत्या ट्रेनमधून प्रवाशांचा मोबाईल हिसकावला, जीवाची परवा न करता प्रवाशाने चोरट्याचा अंगावर झडप घातली. यात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून चिंचवड रेल्वे स्थानकातील आरपीएफ ने चोरट्याचा पकडले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी चिंचवड रेल्वे स्थानकाच्या परिसरात घडली आहे. या प्रकरणी मच्छीन्द्र धनराज पवार वय- २६ याला आरपीएफ ने अटक केली आहे. या प्रकरणी सुनील शंकर धनगर वय- ४० यांनी तक्रार दिली असून ते जखमी झाले आहेत.  सुनील शंकर धनगर हे पनवेल नांदेड ट्रेन ने प्रवास करत होते. सायंकाळी साडेसहा च्या सुमारास ट्रेन चिंचवड च्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. तिथं ती थांबली, हळू धावत असलेल्या ट्रेन ने चिंचवड चा प्लॅटफॉर्म सोडला आणि अवघ्या दोनशे मीटर अंतरावर सुनील यांचा मोबाईल आरोपी मच्छीन्द्र ने धावत्या ट्रेनमधून हिसकावला. सुनील यांनी जीवाची परवा न करता चोर, चोर असे ओरडून थेट त्याच्या अंगावर झडप घातली. पण, चोर पळून गेला, त्याचा पाठलाग करून ASI शेलार यांनी त्याला पकडलं. जखमी झालेल्या सुनील यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यांच्या खांद्याला मोठी जखम झाली आहे. आरपीएफ ए.के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man caught mobile thief after chasing in pimpri zws

ताज्या बातम्या