लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पत्नीवर रॉकेल ओतून तिचा खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गंभीर भाजलेल्या पत्नीने ससून रुग्णालयात मृत्यूपूर्व जबाब दिला होता. जबाबाची चित्रफीत सरकार पक्षाकडून न्यायालयात सादर करण्यात आली. मृत्यूपूर्व जबाब, साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.

child marriage kalyan loksatta
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या विवाहाप्रकरणी पतीसह आई, वडील, सासु-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Six people from Dhule sentenced to life imprisonment in murder case
हत्येप्रकरणी धुळे जिल्ह्यातील सहा जणांना जन्मठेप
Accused sentenced to 10 years in hard labor for abusing minor girl in Dharashiv
अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
pune crime news
पुणे: वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप
Mumbai High Court
उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयाकडून राखीव
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
mother and her boyfriend sentenced to life for murdering her child by drowning
मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप

तानाजी दत्ता उर्फ दत्तात्रय सरकाळे (वय २८, रा. तांदळी, शिरूर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. तानाजी आणि प्रियांका (वय २१) यांचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. तानाजी हा प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रियाकांच्या आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले होते. ७ मे २०१६ रोजी तानाजीने प्रियांकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले. रॉकेल ओतल्यानंतर ती घरातून बाहेर पळाली. तानाजीने तिला पेटवून दिले. त्यानंतर तिच्या अंगावर पाणी ओतून तो पसार झाला होता. स्टोव्ह पेटविताना पत्नी भाजली, असा बचाव त्याने केला होता.

गंभीर भाजलेल्या प्रियांकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने मृत्यूपूर्व जबाब ससून रुग्णालयात दिला होता. उपचारादरम्यान तिचा ११ मे रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी केला. आरोपी तानाजीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. पत्नीचा मृत्यूपूर्व जबाब न्यायालयात सादर केला. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपीला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Story img Loader