पुणे : पुण्यातील हडपसर भागातील वैदूवाडी भागात १६ वर्षीय बहिणीचा १८ वर्षीय भावाने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे वैदूवाडी भागात एकच खळबळ उडाली आहे. साफीया सुलेमान अन्सारी वय १६ असे खून झालेल्या बहिणीच नाव आहे .तर शारीख सुलेमान अन्सारी वय १८ असे आरोपी भावाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील वैदूवाडी भागात आरोपी भाऊ शारीख सुलेमान अन्सारी, मयत बहीण साफीया हे कुटुंबीया सोबत राहत होते. पण मयत साफीया ही सतत आजारी असायची, त्यामुळे ती घरातील कोणावरही अचानकपणे अंगावर जायची, साफीया ही भाऊ शारीख याच्या अंगावर १७ जून रोजी गेली. यामध्ये दोघांमध्ये भांडण झाली आणि त्यात भाऊ शारीख याने साफीया हिचा गळा दाबला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

आणखी वाचा-पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात पुन्हा भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

त्यानंतर आरोपी शारीख याने साफीया हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. याबाबत पोलिसांना दिल्यानंतर तो मृतदेह खाली काढण्यात आला. मात्र तपासाअंती आरोपी भाऊ शारीख अन्सारी याने कबुली दिली असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलिस करित असल्याचे सांगितले.