करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागल्या आहेत. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे ही व्यक्ती पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून ते तणावात असायचे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed wife and son pune crime news pune letest news bmh 90 svk
First published on: 10-05-2021 at 13:15 IST