पुण्यातील चाकण परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुणानं कामावरून परत येणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला आहे. पीडित तरुणी रस्त्यावरून घराच्या दिशेनं जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपीनं तिच्याशी जबरदस्ती करत तिच्या ओठाचं चुंबन घेतलं आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणी अत्यंत घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गणेश ज्ञानोबा भोसले असं अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
house burglary nashik marathi news
नाशिक: वावीत घरफोडी करणारी टोळी ताब्यात, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीत काम करते. डे-नाईट शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या बसमधून ती चाकण परिसरातील माणिक चौकात उतरली होती. दरम्यान रात्रीचे साडेदहा वाजले होते. ती आपल्या घराच्या दिशेनं चालत जात होती. तेव्हा, दबा धरून बसलेल्या आरोपी गणेशनं अचानक तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि तिच्या ओठाचं चुंबन घेतलं. या घटनेमुळं पीडित तरुणी अत्यंत घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. आसपासचे नागरिक गोळा झाले. परंतु तोपर्यंत आरोपी गणेश पळून गेला होता. 

हा धक्कादायक प्रकार घडताच पीडित तरुणीने तातडीने चाकण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन चाकण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे अवघ्या २४ तासांत आरोपीला जेरबंद केलं आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगाडे, जऱ्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम गायकवाड यांच्या पथकाने केला आहे.