पुणे शहरातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयने तोंडावर स्प्रे मारून तिच्याच घरात बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या सोबत सेल्फी काढल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला.त्या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आरोपी गेला आणि तुमचे कुरिअर आल्याचे पीडित तरुणीला म्हणाला,हे कुरिअर माझे नसल्याचे तिने सांगितले.तरीही तुम्हाला सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पीडित तरुणीने सेफ्टी डोअर उघडले.त्याचवेळी आरोपीने पीडित तरुणीच्या तोडांवर स्प्रे मारला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलने सेल्फी काढत ‘परत येईल’, असे टाईप करून ठेवले, अशी घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.